ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री साईं अभियांत्रिकी महाविद्यालय, भद्रावती येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय, भद्रावती च्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने ५ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पूर्ण आनंदाने साजरा केला. अंतिम वर्षातील मिथुन निखारे आणि द्वितीय वर्षातील मिस मुस्कान खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी सूर्यांशू सोनुले, नोमेश्वर बेलूरकर, प्रतिक राजूरकर, मिस आयशा शेख आणि मिस दिशा गाताडे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विविध घटना आणि जीवनशैलीवर भाषणे केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. इंजि. एन. एम. बांगरे, अध्यक्ष आणि मा. डॉ. पी. के. जैन, उपाध्यक्ष ईवा, नागपूर केंद्र यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना आशिर्वाद दिले. या कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांना त्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. लवलेश यादव, डीन आयक्यूएसी प्रा. वर्षा सादरानी, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख, प्राध्यापकगण व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्षा मा. श्रीमती. विद्या व्ही. येरगुडे, मा. अमित व्ही. येरगुडे (सचिव), मा. अभिषेक व्ही. येरगुडे (उपाध्यक्ष) आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद एस. गोरंटीवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि प्राध्यापकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये