ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती नगरपालिकेच्या तिजोरीतील ठणठणाट अधिवेशनात

जबाबदार घटकांवर कारवाईची मागणी : आमदार करण देवतळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         गेल्या अनेक वर्षांपासून भाजी मंडई व बाजारपेठेसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी जागेचं ₹49.25 लाख भाडं थकवल्यामुळे न्यायालयाने नगरपालिकेच्या साहित्याचे जप्तीचे आदेश दिले आणि ३० जून रोजी कार्यालयावर प्रत्यक्षात जप्तीची कारवाईही झाली.

ही कारवाई नगरपरिषदेच्या अनियोजित कारभारावर मोठा ठपका आहे. सामान्य नागरिकांनी थोडा उशीर केला तरी त्यांच्यावर कारवाई होते, पण इथे संपूर्ण नगरपालिका कार्यालयावर जप्ती लावली गेली, ही बाब अत्यंत संतापजनक आहे.

पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट केली, याची सर्वसमावेशक चौकशी होणे गरजेचे आहे. सोबतच भद्रावती नगर परिषदेकडे हक्काची जागा नसल्यामुळे शहर हद्दीतील शासकीय जागा नगरपरिषदेला अतिरिक्तरित्या ताब्यात देण्यात यावी, अशी विनंतीही आमदार करण देवतळे यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाकडे केली आहे.

या संपूर्ण विषयावर शासनाने तातडीने आढावा बैठक घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, जबाबदार घटकांवर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी आमदार देवतळे यांनी सभागृहात आज केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये