ताज्या घडामोडी

आ. किशोर जोरगेवार स्वगृही परत – चंद्रपूर विधानसभा भाजपाच्या चिन्हावर लढणार

माजी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर ह्यांचाही भाजपा प्रवेश - सुधिर मुनगंटीवार ह्यांच्या हस्ते दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपाच्या समाजाची सेवा करण्याच्या मिशनला गती येईल आणि भाजपा चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा च्या जागा प्रचंड मताधिक्याने जिंकून येईल असा विश्वास महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.लवकरच किशोर जोरगेवार यांची भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होईल असेही त्यांनी एन डी हॉटेल येथे घोषित केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली उमेदवारी म्हणून ज्या उमेदवारीकडे पाहिले जाते ती उमेदवारी म्हणजे चंद्रपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी होय. चंद्रपूर विधानसभेमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत कमालीचे औत्सुक्य संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाले होते. दररोज घडणाऱ्या वेगवान घडामोडी आणि रोज ताणल्या गेलेली उत्सुकता, निवडणूक नामांकन अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारासह नेत्यांच्याही मुंबई – दिल्ली वाऱ्या यामुळे ही उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल? याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच चर्चा रंगली होती. विविध घडामोडीनंतर अखेर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशामुळे येथील भाजपाची उमेदवारी किशोर जोरगेवार यांनाच मिळेल हे निश्चित झाले आहे.

पूर्वाश्रमीचे भाजपाचे किशोर जोरगेवार यांनी 2019 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून भाजपाचे नाना शामकुळे यांचा 72 हजाराहून अधिक मताने पराभव केला होता. त्यानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपामध्ये प्रवेश करून कमळाचे फुल आपल्या हाती घेतले आहे.
स्थानिक एनडी हॉटेल येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमांमध्ये किशोर जोरगेवार यांचा भाजपमधील प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेश सोहळ्याला भूतपूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ भाजपा नेते प्रमोद कडू, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह काँग्रेस च्या महिला आघाडीच्या अध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांचाही भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. प्रवेश सोहळ्याच्या अनुषंगाने जोरगेवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये