ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या वाहन चालकास अटक

आरोपीच्या ताब्यातून व्यापाऱ्याचे नगदी 9 लाख 42 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे – श्री अनुराग गोपालदास चांडक, वय 40 वर्ष, रा. वार्ड क्रमांक 02 वायगाव (निपाणी) तहसील जिल्हा वर्धा यांनी पो स्टे. देवळी येथे तक्रार दिली की, त्यांचे स्वतःचे मालकीचे होलसेल किराणा दुकान असून दुकानातील किराणा व कॉस्मेटिक माल बाहेर जिल्ह्यात पाठवीत असतात.

दिनांक 29/06/2025 रोजी त्यांनी त्यांचे परिचयाचे वाहन चालक नामे पवन गोपालराव ढेंगरे, वय २८ वर्ष रा. कारला चौक वर्धा यांचे मालकीची महिंद्रा बोलेरो पिकप गाडी क्रमांकMH 32 AJ 3614 मध्ये दुकानातील किराणा वस्तू भरून खेड नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ या गावी दुपारी 02/30 वाजता दरम्यान पाठविले व ते सदर ठिकाणी जाऊन तेथील दुकानदारांना गाडीतील किराणा माल वितरित करून किराणा वस्तूंचे नगदी 10,00,000/-₹ व्यापार्याकडून घेऊन यवतमाळ येथे परत आला व फिर्यादी यांचे सांगणे वरून सदर रक्कमेतील काही रक्कमेचा किराणा व कॉस्मेटिक सामान खरेदी करून उर्वरित 9,42,920/-₹ घेऊन वाहन चालक पवन ढेंगरे हा यवतमाळ येथून रात्री 08/00 वाजता दरम्यान वायगाव कडे परत येण्याकरिता निघाला असता रात्री १०.३० वाजता दरम्यान ड्रायव्हर चे जावई नामे आशिष सुरकार यांनी फिर्यादी यांना फोन करून सांगितले की देवळी ते वायगाव रोडचे मधात वडद गावाजवळ अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवर येऊन पवन ढेंगरे याचे ताब्यातील गाडी थांबवून त्याचे ताब्यातून नगदी पैसे घेऊन गेले आहे. अशी माहिती दिली त्यावरून फिर्यादी यांनी ड्रायव्हर पवन ढेंगरे याला फोन करून घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की तो यवतमाळ वरून वायगाव कडे येत असताना वडद गावाजवळ दोन मोटरसायकलवर तीन ते चार लोकांनी त्याला अडवून त्याचे गाडीचा समोरील काच फोडून गाडीची चाबी काढून गाडीत ठेवून असलेले नगदी 9,42,920/- रुपयाची पैशाची थैली घेऊन मोटरसायकलने पळून गेले असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन देवळी येथे अप क्रमांक 490/25 कलम 309(1), 309(3) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

     सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखे तर्फे समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील फिर्यादीचे ड्रायव्हर नामे पवन ढेंगरे यास गुन्ह्यातील आरोपी संबंधाने सखोल विचारपूस केली असता तो आरोपीतांचे वर्णन बाबत व घटनेबाबत वारंवार वर्णन बदलवीत असल्याने व त्याचे बोलण्यात विसंगती निर्माण होत असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त करून त्यास कसून विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याला त्याची गाडीचे बँकेची थाकबाकी व उधारीचे पैसे परत करणे असल्याने त्याने स्वतः घटनेचा बनाव करून फिर्यादीचे पैसे लपवून ठेवले आहे. असे सांगितल्याने ड्रायव्हर सह जाऊन गुन्ह्यातील संपूर्ण नगदी रक्कम 9,42,920/-₹ जप्त करून सदरचा गुन्हा उघड करून आरोपी पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन देवळी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोउपनि श्री. बालाजी लालपालवाले, श्री. राहुल इटेकार, पोलीस अंमलदार चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, अमोल नगराळे, मंगेश चौरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये