ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
हरित क्रांती चे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा यांच्या वतीने मेन रोडवर असलेल्या वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जनसेवा सामाजिक संघटना तथा दे.राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष श्री बळीराम मापारी मामा,स्व.भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष श्री प्रकाश खांडेभराड , प्रा.अशोक डोईफोडे सर व प्रकाश अहिरे या प्रसंगी उपस्थित होते..