ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

स्वप्नाच्या पुर्ततेसाठी परीश्रमासाठी सज्ज व्हा – डाँ. अभिलाषा गावतुरे

मूल येथे पार पडला गुणवंताचा गौरव सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

समाधानी जीवन जगण्यासाठी सामाजीक बांधीलकी जोपासून आपल्या अंगी असलेले कलागुण आणि क्षमतेचा समाजासाठी वापर करा आणि उराशी बाळगलेल्या स्वप्नाची पुर्तता करण्यासाठी खचून न जाता नव्या उत्साहाने परिश्रम करण्यासाठी सज्ज झाल्यास आपल्या स्वप्नांची पुर्तता होण्यास वेळ लागणार नाही. असे मत सामाजीक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केले.

         भुमिपुत्र ब्रिगेड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ आणि विदर्भ तेली महासंघ शाखा मूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि करियर मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सामाजीक क्रांतीचे आधारस्तंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्य स्थानिक कन्नमवार सांस्कृतिक सभागृह येथे नुकताच गुणवंताचा गौरव सोहळा संपन्न झाला. भुमीपुत्र ब्रिगेडच्या संयोजीका डाॅ. अभिलाषा गावतुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन आलापल्ली येथील उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांचे हस्ते पार पडले. अहेरी तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ. किरण वानखेडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त किरण गावतुरे, प्राचार्य डाॅ. अनिता वाळके, प्राचार्य अशोक झाडे, प्राचार्य गंगाधर कुनघाडकर, करीअर मार्गदर्शक  विजय मुसळे, डॉ. राकेश गावतुरे, माळी महासंघाचे विभागीय सचिव गुरू गुरनूले, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हसन वाढई, विदर्भ तेली महासंघाचे जिल्हा संधटक कैलास चलाख, विषमता निर्मुलन समितीचे संयोजक हिरालाल भडके, ज्येष्ठ साहित्यीक प्रब्रम्हानंद मडावी, निवृत्त प्राचार्य बंडु गुरनूले आदि उपस्थित होते. थोर महात्म्यांच्या प्रतिमा पुजन आणि दिप प्रल्वजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक होवून भविष्याच्या वाटचाली करीता प्रेरणा मिळावी म्हणून अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होणे आवश्यक असून नव्या राष्ट्रीय शैक्षणीक धोरणामूळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शनाची गरज आहे. गुणवंतानी ध्येय डोळयासमोर ठेवून विचलीत न होता शैक्षणीक वाटचाल केल्यास प्रगतीची शिखरं गाठणे सहज शक्य असल्याचे मार्गदर्शन डॉ. किरण वानखेडे, नितेश देवगडे, किरण गावतुरे, डॉ. अनिता वाळके, विनोद मुसळे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता बारावी आणि दहावी मध्यें गुणवंत ठरलेल्या शंभराचे वर विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यांत आला. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी प्रास्ताविक केले,  अॕड. प्रशांत सोनुले यांनी संचलन तर युवा कार्यकर्ते रोहीत निकुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्याशिवाय त्यांचे पालक आणि निमंत्रीत मोठया संख्येनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये