ट्रॅक्टर इंजिनचे पार्ट चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील झिंगुजी वार्ड येथे घरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर इंजिनचे पार्ट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक १ जूनला घडली या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी तपास करून दिनांक २७ जूनला आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या पार्ट अंदाजे किंमत १८ हजार सह आरोपीला अटक केली आहे.
सुरज उर्फ गोलू किन्नाके वय २५ वर्ष राहणार फुकट नगर असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी भारत नागपुरे राहणार झिंगुजी वार्ड हे नेहमीप्रमाणे सकाळी शेती कामासाठी लागणारे ट्रॅक्टर चालू करण्यासाठी गेले असता ते ट्रॅक्टर चालू झाले नाही त्यांनी इंजन खोलून तिथे पाहणी केली असता त्या इंजन मधील सुटे पार्ट चोरट्यांनी चोरून नेण्याचे उघड झाले. त्या चोरट्याने ट्रॅक्टरचे स्टार्टर सेल , बॅटरी, लोखंडी वेटिंग पट्टा सह इतर साहित्य चोरून नेले होते.
या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली पोलिसांनी २६ दिवसातच त्या चोरट्यांचा शोध घेवून त्यांचे घरातून ट्रॅक्टर पार्टसह त्याला ताब्यात घेतले ही कारवाई ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात गजानन तुपकर ,महेंद्र बेसरकर ,अनुप आस्टूनकर , जगदीश झाडे ,विश्वनाथ चौधरी यांनी केली