ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट स्टड्ढोक सफारी महाराष्ट्र परिषदेचे ताडोबा येथे आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : नुकतेच ताडोबा येथील निसर्गरम्य परिसरात महाराष्ट्र चेष्टर इंटरव्हेन्शनल रेडीओलॉजी च्या तज्ञाची कॉन्फरन्स चे यशस्वी आयोजन करण्यात आले. ह्या परिषदे मध्ये ३५ वरिष्ठ रेडिओलॉजी विषयातील इंटरव्हेन्शनल हयात निपून अशा तज्ञाचे मोलाचे मार्गदर्शन तसेच टड्ढेनिंग, वर्कशॉप आयोजीत करण्यात आले.

या परिषदेमध्ये सुमारे १३० सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला असून संपूर्ण भारतातून एम्स दिल्ली, एम्स रायपूर, हैद्राबाद, भोपाल, एम्स नागपूर, दत्ता मेघे मेडिकल इंस्टीट्यूट, के. ई. एम. मेडिकल कॉलेज मुंबई, बी. जे. मेडिकल पुणे, सायन हॉस्पीटल मुंबई, टाटा मेमोरीयल हॉस्पीटल मुंबई, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल नागपूर, टाटा कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुर, त्याचप्रमाणे अनेक मेडिकल कॉलेज मधील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट नी सहभाग नोंदवीला व ह्या अधिवेशनाचा लाभ घेतला. या आयोजनाची संपुर्ण जबाबदारी आयोजन समितीचे डॉ. रवि रत्नकांतन, डॉ. श्रीकांत कोठेकर, डॉ. विमल सोमेश्वार, डॉ. क्रांतीकुमार राठोड, डॉ. गिरीश बरवडेकर, डॉ सुयश कुलकर्णी, डॉ. हेमंत देशमुख, डॉ. राजेश मुंधडा, डॉ उदय लिमये, डॉ. अतुल रेवनकर, डॉ. पंकज बानोद, डॉ. सचिन ढोमणे, डॉ. जवाहर राठोड, डॉ. प्रतिक बांगडे ह्यांनी विशेष परिश्रम घेवून यशस्वी आयोजन केले. अधिवेशनानंतर सर्वांनी टायगर सफारी ताडोबा चा आनंद घेतला व बहुतेक सर्वांनाच वाघोबाचे व इतर अनेक प्राण्याचे दर्शन घडले. दुरदुरुन आलेल्या डॉक्टरांपैकी बरेच डॉक्टर्स ताडोबाला प्रथमच आले होते. व त्यांनी ताडोबाची व आयोजकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली व समाधान व्यक्त केले.

या अधिवेशनाच्या आयोजनाकरीता सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल मेडिकल कॉलेज, नागपूर चे विभागप्रमुख डॉ. जवाहर राठोड व यांची संपूर्ण टीम व विद्यार्थी व चंद्रपुरचे डॉ. प्रतिक बांगडे ह्यानी व सर्व सहकाèयांनी विशेष परिश्रम घेवून हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये