ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशाचा नागरिक सुदृढ राहण्यासाठी योगा अत्यंत महत्त्वाचा

आंतरराष्ट्रीय योग दिवस ७०० योगभगिनींच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट

डॉक्टर अशोकराव उईके आदिवासी मंत्री तसेच पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर व महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व चंद्रपूर ११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस महेश भवन तुकूमला ७०० योगभगिनींच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला

     मोदी सरकारची यशस्वी ११वर्षे, “संकल्प से सिद्धी” या अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन महेश भवन तुकुम येथे घेण्यात आला.

 विश्वयोगदिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले चंद्रपूर जिल्हयाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किशोरभाऊ जोरगेवार यांनी त्यांच्या भाषणातून योगदिनाचे महत्व सांगून तसेच योगशिबीर शृंखला राबविण्याचे घोषीत केले आणि महिला पतंजलीला योगभवन देवून परमपूज्य स्वामी रामदेव बाबा यांना चंद्रपूर नगरीत बोलावण्याचे सांगीतले

  तसेच विश्वयोगदिनाला उद्घाटक म्हणून लाभलेले चंद्रपूर जिल्हयाचे यशस्वी पालकमंत्री माननीय डॉ. प्रा.अशोकजी उईके यांनी योगदिनाची माहिती दिली व योगासाठी माझे योगदान सदैव राहणार असे आश्वासित करीत शुभेच्छा दिल्या

   चंद्रपूर महानगर जिल्हयाचे नवनियुक्त भाजप शहर अध्यक्ष माननीय सुभाषभाऊ कासनगोटटूवार व त्यांच्या अर्धांगिनी सौ मंजूश्री कासनगोट्टूवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात २४ ठिकाणी योगा दिवसाचे आयोजन करण्यात आले.

      माननीय जोरगेवार भाऊंच्या नेतृत्वात सुभाषभाऊंनी महिला पतंजली योग समितीला सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी अनमोल मदत केली.

  कार्यक्रमात महिला पतंजलीच्या राज्यकार्यकारीनी सदस्या स्मिताताई रेभणकर व जिल्हा प्रभारी नसरीन शेख यांना सन्मानित करण्यात आले.

     21 जूनचा आयूष मंत्रालयाचा प्रोटोकॉल घेवून, प्रास्ताविक, डॉन्स, स्वागतगीत, तसेच योगशिक्षिकांचा वर्षभर निशुल्क योगसेवा दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महिला पतंजलीच्या जिल्हा व तालुका प्रभारी तसेच योगशिक्षिका, योगसाधिका, कर्मठ कार्यकर्ता यांची उपस्थिती होती सर्वांच्या सहकार्याने उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रभारी नसरीन शेख व प्रतिभा रोकडे यांनी केले.

शांतीपाठ, आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली

 करे योग । रहे निरोग ।

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये