9 जुलै रोजी 48 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाची अधिसुचना दिनांक 05/03/2025 नुसार देऊळगांवराजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीची सरपंचाची पदे महाराष्ट्र्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम 30 (4) (5) अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक नियम 1964 मधील तरतुदी नुसार सन 2025 ते 2030 दरम्यान देऊळगांवराजा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकीव्दारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक 09/07/2025 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता तहसिल कार्यालय देऊळगांवराजा येथील निवडणुक विभाग येथे निश्चित करण्यात येणार आहे.
तसेच अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रियांकरिता आरक्षण सोडत दिनांक 09/07/2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता तहसिल कार्यालय देउळगावराजा येथील निवडणूक विभाग येथे निश्चित करण्यात येणार आहे.
सदर आरक्षण सोडती करीता देऊळगांवराजा तालुकयातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन देऊळगाव राजा येथील तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.