ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावसाळ्यापूर्वी रस्त्याला पडलेले खड्डे गिट्टी-बोल्डर किंवा मातीने तरी बुजवा हो…

अ-हेरनवरगांव व परिसरातील जनतेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :- तालुक्यापासून ०६ किलोमीटर अंतरावर नावारूपातअसलेल्या अ-हेरनवरगांव ते ब्रह्मपुरी या रस्त्यावर दरवर्षी रेतीने भरलेले हायवा ट्रक व ट्रॅक्टर यांच्या वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डे पडतात , पडलेली आहेत.

सहा किलोमीटर अंतरापैकी एक दीड किलोमीटर सिमेंट काँक्रीट चा रस्ता तयार झालेला आहे आणि त्याला हल्ली मोठ मोठ्या भेगा पडलेल्या आहेत.

दोन-तीन महिन्या अगोदर नव्यानेच अंदाजे दीड- दोन किलोमीटर चा निकृष्ट रस्ता डांबरीकरणाने तयार करण्यात आलेला आहे. या रस्त्यावरून मोटार सायकल चालविली असता ती पूर्ण लहरत जाते. तेव्हा समोरून येणाऱ्या एखादा वाहनाला जाऊन आदळते की काय अशी भीती वाटते. डांबरीकरणाचा रस्ता तयार झाला परंतु अजूनही बाजूचे स्लोप मुरुमाने तुटक तुटक अपूर्ण भरण्यात आले त्यामुळे रात्रो वाहनधारकांना गाडी चालवतांना जीवावर उदार होऊन आपले वाहन चालवावे लागते.

उर्वरित रस्ता हा खड्डेमय परिपूर्ण वाहतुकीसाठी तयार आहे

या खड्ड्यामुळे रस्त्यावरून वाहन चालवितांना पावसाळ्यात वाहनधारकांना कमालीची कसरत करून आपले वाहन चालवावे लागणार आहे. अन्यथा घसरला की पसरला अशी अवस्था…

अ-हेरनवरगांव ,भालेश्वर, पिंपळगाव (भोसले)या परिसरातील वाहनधारकांचे, शालेय विद्यार्थ्यांचे, कामगार वर्गाचे हित लक्षात घेऊन शासनाने काना डोळा न करता या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे पावसाळा सुरू होण्यापूर्वी जे काही मिळेल माती- गोटा, मुरूम, सिमेंट- काँक्रेट ने बुजवून देण्याची मागणी जनतेने केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये