ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खल्ल्याळ गव्हाण येथील बंद असलेला शेत रस्ता खुला करण्यात आला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळगव्हाण येथील गट नंबर 188 पासून 195 पर्यंत जाणारा शेत रस्ता माननीय नायब तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या आदेशान्वये आज दिनांक 20 जुन रोजी खुला करण्यात आला. सदर रस्ता पाच वर्षापासून बंद होता. रस्ता खुला करताना मंडळ अधिकारी मेहूनाराजा विजय हिरवे, ग्राम महा अधिकारी परमेश्वर बुरकुल, आजू बाजू चे शेतकरी तथा पंच हजर होते.
सदर रस्त्याचा लाभ अंदाजे 35 शेतकऱ्यांना होणार असून रस्त्याची लांबी 750 मीटर आहे. लाभधारक शेतकर्यांचे अंदाजे क्षेत्र 25 हेक्टर आहे. रस्ता खुला करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.