ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून स्मार्ट ग्राम बिबीमध्ये प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाची पाहणी

नांदा व आवाळपूरमध्येही भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 जिल्हा परिषद चंद्रपूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी पंचायत समिती कोरपना अंतर्गत आवाळपूर, नांदा व बिबी ग्रामपंचायतींना मंगळवारी भेट दिली. त्यांच्यासोबत कोरपना येथील गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे उपस्थित होते.

आवाळपूर येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सरपंच प्रियंका दिवे, ग्रामपंचायत अधिकारी धीरज बोरकर उपस्थित होते. नांदा येथे वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांवर चर्चा झाली. या वेळी सरपंच मेघा पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, सदस्य रत्नाकर चटप व ग्रामपंचायत अधिकारी नरेश धवणे उपस्थित होते.

यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, कचरा विलगीकरण कक्ष, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प व पंचायत लर्निंग सेंटरची पाहणी झाली. स्मशानभूमी व कब्रस्तान परिसरात “एक पेड मॉ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे, जिल्हा समन्वयक संजय धोटे, गट समन्वयक लॉरेन्स खोब्रागडे व सल्लागार विठ्ठल अहिरकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये