ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दि लिटल फ्लॉवर स्कूलचा 100 टक्के निकाल   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

दि पब्लिक एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित दि लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल नगीना बाग चंद्रपूर स्थित दरवर्षी प्रमाणे यंदाही चौथ्या वर्षाची परंपरा राखत दहावीचा निकाल 100 टक्के लागला. या शाळेतून दहावी च्या परीक्षेत 34 विध्यार्थी बसले होते.19 विद्यार्थी उत्कृष्ठ श्रेणित पास झाले.

यात त्रिशाला कुंदन संगमावर (94.80)प्रथम स्वरित प्रशांत जांबुळे (91.80)द्वितीय व तनवी मोहुर्ले (90)टक्के घेऊन शाळेतून तृतीय आली.आदित्य खोब्रागडे(89.40), नेत्रा काकडे (84.49),जानवी अलोणे (84),आदित्य लोणबळे (84),अन्यना चितकला(84.20),शिवम अंडेलकर (84),पियुष मांदाळे (83.40),अमेय जनगणवार (83.80),सार्थक घोरे(81.20), तन्मय अंडरस्कर(81), अनुष्का बोरकर (80.20),अयान अन्सारी (80.20)विद्यार्थी टक्के घेऊन उत्तीर्ण झाले.19 विध्यार्थी सर्वोकृष्ठ गुण घेतले, 11 विध्यार्थी प्रथम श्रेणित तर 4 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले.

या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रमिला गुलाबरावजी दुबे, उपाध्यक्ष सिद्धार्थ घनश्याम गोसावी, सचिव ममता घोडेस्वार, प्रदीप दुबे, शाळेच्या मुख्यध्यापिका मीनाक्षी मून व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंदानी सर्व दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये