ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नंदोरी येथे युवा सेनेची शाखा गठित

नाम फलकाचे अनावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शाखा प्रत्येक गावात उघडण्याची मोहीम युवा सेनेद्वारे तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.

या मोहिमे अंतर्गत तालुक्यातील नंदोरी येथे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या उपस्थितीत युवा सेनेची शाखा गठीत करण्यात आली.यावेळी युवा सेनेच्या नामफलकाचे अनावरणही जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे, शिवसेना जिल्हाप्रमुख अड. युवराज धानोरकर, वरोरा भद्रावती समन्वयक मुनेश्वर बदखल, नंदोरी शाखाप्रमुख संजय दशरथ भोयर, युवा सेना सचिव रितिक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आलेख रट्टे यांनी कार्यकर्त्यांना जनतेतील संपर्क वाढवून कामाला लागण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी धीरज बघमारे, मंगेश अवगान, प्रफुल एकरे,सर्वेश कुंबरे आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये