ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर जुनी नगर परिषद प्रांगनात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

-जुनी नगर परिषद प्रांगणात महाराष्ट्र शासना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर २०१५ नुकतेच संपन्न झाले. ‘या शिबिरामध्ये विविध प्रशासकीय विभागातील शासनाच्या विविध योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली व असंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या अध्यक्षतेमध्ये शिबिर संपन्न झाले.

       जिल्हाधिकारी बुलढाणा डॉ किरण पाटील यांच्या निर्देशानुसार तथा उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे सि .राजा यांच्या मार्गदर्शनात व तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या अध्यक्षतेखाली राजस्व मंडळ देऊळगाव राजा यांच्या वतीने न.प. प्रांगणात महाराष्ट्र शासना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये विविध प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आपल्या विभागातील सेवा घेऊन उपस्थित होते यामध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख, पशुधन विकास विभाग, दुय्यम निबंधक, विधी सेवा विभाग, पुरवठा विभाग, आदीसह इतर विभागाने सहभाग घेतला होता. आपल्या विभागातील योजनांची माहिती संबंधितांनी दिली व लाभार्थ्यांची कामे पूर्ण केली.

     यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनेचे लाभ तसेच प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले

    सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ हे होते. तर उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार घोटकर, नायब तहसीलदार सायली जाधव, गटविकास अधिकारी मुकेश मोहोर, मंडळ अधिकारी रामदास मान्टे, आरोग्य अधिकारी महेश वाळूकर, पशुधन अधिकारी डॉ चिरफरे, कृषी विभागाचे शिंगणे,विधी सेवा समिती सदस्य श्रीमती सरस्वतीताई टेकाळे, जांभोरा सरपंच डुरे, जेष्ठ पत्रकार सुरज गुप्ता, भूमि अभिलेखचे खेडकर, पुरवठा विभागाचे फाले आदींचे प्रमुख उपस्थिती होती. विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी व स्वस्त धान्य दुकानदार असोशियन आणि वाईंडर असोशियनचे पदाधिकारी उपस्थित होते

     सदर शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात, राजस्व विभाग देऊळगाव राजाचे मंडळ अधिकारी रामदास मांटे, तलाठी देशपांडे, खरात, वाघ मॅडम, रगडे मॅडम, सुहास जोशी आदींनी शिबीर यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज गुप्ता तर आभार प्रदर्शन रामदास मांटे यांनी केले. या शिबिरामध्ये लाभार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये