ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कातलाबोडी फाटा ते येरगव्हान या रस्त्याचा कामाला झाली सुरुवात

युवा कार्यकर्ता कडू काताडे यांच्या मागणीला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रमोद गिरडकर

कातलाबोडी फाटा ते येरगव्हान रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे हा रस्ता अनेक दिवसापासून काम बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता व कोरपणा तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना मोठी कसरत करावी लागत होती व कोणतेही काम असल्यास आजूबाजू खेड्यातील नागरिकांना तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे यावे लागते येणारा पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास होईल

अशी चिंता वाटत असल्यामुळे युवा कार्यकर्ता कवडू गाताडे यांनी रस्ता दुरुस्तीचे बंद काम सुरू करण्याबाबत बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन सतत पाठपुरवठा केले व बातम्या प्रकाशित करून संबंधित विभागाला जाग आणली व गाताडे यांचा मागणीकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन बंद रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली रस्त्याचे काम सुरू असल्याने परिसरातील नागरिकाकडून कवडू गाताडे यांचे आभार व्यक्त होत आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये