ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रशासकीय अधिकारी चरणदास शेडमाके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गड़चांदुर नगर परिषदेचे प्रशासकिय अधिकारी, चरणदास तुळशिराम शेडमाके यांना वयाचे ५८ वर्ष पुर्ण झाले त्यामुळे नियत वयोमानानुसार 30 जून ला निरोप संमारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी न.प. अध्यक्षा सौ. सविता टेकाम होत्या,प्रमुख पाहुणे म्हणून न.प. मुख्याधिकारी डाॅ. सुरज जाधव, सत्कार मुर्ती चरणदास शेडमाके, पत्नी सौ. अरूणा शेडमाके, उपाध्यक्ष, शरद जोगी,आरोग्य सभापती विक्रम येरणे, बांधकाम सभापती मीनाक्षी एकरे , माजी सभापती आश्विनी कांबळे, प्रामुख्याने उपस्थित होते.
सविता टेकाम मॅडम आणि मुख्याधिकारी यांनी सत्कार मुर्ती यांचा शाल, श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला, तसेच सौ. अरूणा शेडमाके यांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. टेकाम मॅडम यांनी शेडमाके यांच्या जिवन शैलीवर प्रकाश टाकला. डाॅ सुरज जाधव मुख्याधिकारी यांनी अल्पशा कालावधी मध्ये चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी असा उल्लेख केला. कु. मेघा माने, संतोष गोरे यांनीसुद्धा कार्याची प्रसंशा केली, शेडमाके यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगीतले की,१६ जुलै, १९८६ ला नगर परिषद बल्लारपूर येथे लिपीक या पदावर नोकरीला लागलो.कालांतर संर्वागामध्ये समावेश झालो,आणि ३१/१२/२०१८ ला ‘ब’ श्रेणी मध्ये पदोन्नती होऊन न.प. गडचांदूर येथे बदली झाली.
संतोष करदोळे यांनी शेडमाके यांचा थोडक्यात परिचय दिला. स्वप्नील पिदूरकर अभियंता यांनी संचालन केले तर कु. मेघा माने लिपीक यानी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाकरीता प्रितीश मगरे संगणक अभियंता, अनुप भगत स्थापत्य अभियंता, मनोज कुंभारे लेखापाल, विक्रम क्षिरसागर लेखापरिक्षक, विशाल मंगरुळकर, सौ. प्रिया ठाणेकर, कु. तुळसा पेटकर, सचिन खनके, पिदूरकर, गजानन कोल्हेकर, सचिन कांबळे, सचिन ढोंगे, सलिम बेग, कर विभाग प्रमुख, श्रीमती मंदा गोंडे, कल्पना पेंदोर, विना खैरे, जिवन टिपले यांनी परिश्रम घेतले. आणि शेवटी चरणदास शेडमाके यांनी आपल्याकडील चार्ज सलीम बेग यांना देऊन आपला निरोप घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये