नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : काँग्रेस
तीन वर्षीय मुलांवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला प्रकरण

चांदा ब्लास्ट
घुग्घूस : शहरात दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास तीन वर्षीय बालकांवर जवळपास आठ ते दहा मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला करीत संपूर्ण शरीरावर चावा घेऊन गंभीररित्या घायाळ केले
याची संतप्त प्रतिक्रिया म्हणून आज शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप – निरीक्षक योगेश पाटील यांना निवेदन देऊन नगरपरिषद घुग्घूसच्या मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली व यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदे जाऊन निषेध आंदोलन केले.
नगरपरिषद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड हैदोस माजला आहे.
शहरातील प्रत्येक वॉर्डात मोकाट कुत्र्यांचे दहा – दहा, वीस – वीसचे टोळके एकत्रितपणे फिरत असून यांच्याकडून गाईचे वासरू, म्हशीचे पिल्ले, कोंबडी व अन्य पाळीव प्राण्याचे शिकार करीत असतात यांच्यापासून वयोवृद्ध नागरिकांना प्रचंड धोखा निर्माण झाल्याने ज्येष्ठ नागरिक शहरात फिरत असतांना सोबत काठ्या घेऊन निघतात मात्र लहान – लहान चिमुकले मुलं या कुत्र्याच्या तावडीत सापडत असल्यामुळे पालक वर्गात प्रचंड अशी भीती व आक्रोश निर्माण झालेला आहे.
शहर काँग्रेस तथा महिला काँग्रेसच्या वतीने 2022 पासून नगरपरिषदेला वारंवार निवेदने देऊन हिंसक मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
मात्र यामागणीला नगरपरिषदेने सकारात्मक प्रतिक्रिया न दिल्याने तसेच मोकाट कुत्र्यावर कारवाई न केल्याचाच परिणाम आज एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली आहे.
नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी
तसेच पीडित मुलांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये,तालुका सचिव विशाल मादर, ज्येष्ठ नेते शेखर तंगडपल्ली, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,
महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, ज्येष्ठ नेत्या संध्या मंडल,शिल्पा गोहील, नाजनीन पठाण, जोया शेख, सुगमा डोमा, लक्ष्मीबाई गोदारी, बालकिशन कुळसंगे,सुनील पाटील,दिपक पेंदोर, दीपक कांबळे,ज्येष्ठ नेते स्टिवन गुंडेटी, कुमार रुद्रारप,रोहित डाकूर, नुरूल सिद्दीकी, निखिल पुनघंटी,सुरज मिश्रा, शहंशाह शेख, अरविंद चहांदे, देव भंडारी,कपिल गोगला, गिरीश गोहिल,अनवर सिद्दीकी,सुमेश रंगारी, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.