एकावेळी दोन ठिकाणी गुटखा कार्यवाही
एकूण १ लाख २६ हजारावर मुद्येमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी दिनांक 03.06.2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग पुलगांव श्री. राहुल चव्हाण, यांना मुखबीर द्वारे गोपनिय माहीती प्राप्त झाली की, पोलीस स्टेशन पुलगांव हद्दीत दोन इसम आपले राहते घरी अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक, सुधिर बनकर सोबत सफौ. दिपक जाघव, ब.नं. 1116, पोलीस शिपाई रामदास दराडे, ब.नं. 1464, पोलीस शिपाई संदीप बोरबन, ब.नं. 635, शिपाई उमेश बेले, ब.नं. 180, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभाग पुलगांव यांनी एकाच वेळी आरोपी 1) सर्वेश किशोर जयस्वाल, रा. वार्ड क्रमंक 3 बडे प्लाँट, पंचधारा रोड नाचणगांव याचे ताब्यातुन 13,270/- रू व आरोपी 2) पंकज तिलकराज बत्रा, रा. वार्ड क्रमंक 6 पुलगांव याचे ताब्यातुन 1,13,378/- रू. मुद्येमाल जप्त करून नमुद दोन्ही आरोपी विरूध्द वेगवेळे गुन्हे नोंद करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
सविस्तर असे आहे की, घटना ता. वेळी व ठिकाणी दिनांक 02.06.2025 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग पुलगांव श्री. राहुल ल. चव्हाण, यांना मुखबीर द्वारे गोपनिय माहीती प्राप्त झाली की, यातील नमुद दोन्ही आरोपी हे आपल्या राहते घरी अवैद्य रित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण आहे.
त्या अनुषंगाने आमचे मार्गदर्शनात पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी छापा टाकुन त्यांचे ताब्यातुन वेगवेगळया प्रकार चे सुगंधीत तंबाखु जप्त करून आरोपीतां विरूध्द गुन्हा नोंद करून अशी एकुण जु.कि. 1,26,648/- रू. चा माल जप्त केला आहे.