ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन रामनगर जिल्हा वर्धा पोलीसांची दारूबंदी कायद्यान्वये कारवाई

एकूण कि. २ लाख १४ हजारावर माल जप्त करून फरार आरोपी विरूध्द गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

यातील पोलीस स्टेशन रामनगर येथे मुकबिर कडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, आरोपी नामे वैभव किटे रा. दिनेश क्षिरसागर यांचे घरी किरायाने आलोडी वर्धा हा अवैध रित्या देशी व विदेशी दारू बाळगुन चोरट्या मार्गाने विक्री करीत आहे. अशी विश्वासनिय माहीती मिळाले वरून वर नमुद आरोपी वैभव किटे हे किरायाने राहत असलेल्या घराची घरझडती घेणे कामी पो.स्टॉप व पंच असे रवाना झाले. आरोपी यास पोलीस आल्याची चाहुल लागताच घरून पसार झाला. आरोपीच्या पत्नीचे हजेरीत पंचा समक्ष पो.स्टॉप चे मदतीने आरोपी किरायाने राहत असलेल्या घराची घरझडती घेतली असता, घरझडतीत घराचे मागील पश्चिमे कडील जिण्या जवळ 1) 3 प्लॅस्टीक पन्नीत देशी दारूने भरलेल्या 90 एम. एल. च्या टैंगो कंपणीच्या 490 प्लॅस्टीक सिलबंद शिश्या, किं 49,000/ रु. 2) 6 प्लस्टीक पन्नीत ऑफिसर चॉईस कंपणीच्या विदेशी दारू ने भरलेल्या 463 प्लॅस्टीक सिलबंद शिश्या, किं 92,600/ रु. 3) दोन मोठे व एका लहान खरडयाचे खोक्यात ऑफिसर ब्ल्यु कंपणीच्या 180 एम. एल. च्या विदेशी दारूने भरलेल्या काचेच्या 120 सिलबंद शिश्या, किं 30,000 /रु 4) एका मोठया व चार लहान खरडयाचे खोक्यात रॉयल स्टॅग कंपणीच्या 180 एम. एल. च्या विदेशी दारूने भरलेल्या काचेच्या 144 सिलबंद शिश्या, किं 43,200 /रु अशा एकुन जुमला कि. 2,14,800 / रु चा माल मिळुन आल्याने फरार आरोपी वैभव कीटे याचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीचा शोध गुन्हे प्रगटीकरण पथकाचे कर्मचारी घेत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. नुरूल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सा. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा सा. आबुराव सोनवणे यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन रामनगर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक महेश चव्हाण व पोलीस स्टेशन रामनगर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे कर्मचारी पोहवा. अरुण घोटे, नापोशी ऋषीकेश धंगारे, पोशी अमोल गित्ते, चेतन पापळे, मपोशी ज्योसना ठाकरे यांनी केली कारवाई केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये