ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गवर भीषण अपघात

सदर बसमध्ये वर्धा जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

संबंधित प्रवासी व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यांशी संपर्क साधावा – जिल्हा प्रशासन

आज दिनांक १ जुलै २०२३ रोजी नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स(MH २९ BE १८१९) या खाजगी बसचा मौज पिंपळखुटा,तहसील सिंदखेड राजा,जिल्हा बुलढाणा येथे समृद्धी महामार्गवरती २ वाजताच्या सुमारास अपघात झाला असून सदर बसमध्ये वर्धा जिल्हातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती बुकिंग ऑफिस कडून प्राप्त झाली. यामध्ये प्रवाश्यांचे संपूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही. सदर बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (07152-243446) अथवा शुभम घोरपडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8888239900) यांच्यांशी संपर्क साधावा असे अहवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवायकांची बुलढाणा येथे जाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन वर्धा यांचेमार्फत करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये