माजी उपनगराध्यक्ष दिनकर आकनुरवार भाजपात – राजुरा भाजपा सदस्य नोंदणीचा श्रीगणेशा
आ. देवराव भोंगळेंनी केली सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
भारतीय जनता पक्षाच्या राजुरा शहरातील सदस्य नोंदणीचा आज नेहरू चौक येथे आ. देवराव भोंगळे ह्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, शेतकरी संघटनेचे नेते, राजुरा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष, संसार कलेक्शनचे संचालक दिनकर आकनूरवार ह्यांची सदस्य नोंदणी करून ह्या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला, आ. देवराव भोंगळे ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी नगरसेवक अशोक कोंडावार यांनीही भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी उपस्थितीत अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षाची सदस्यता ग्रहण केली.
सदस्यता मोहिमेच्या सुरुवातीला भाजपाचे शहर अध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री मिलिंद देशकर, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, संजय उपगन्लावार, मंगेश श्रीराम, बंडू वनकर, प्रणय विरमलवार, पुनम शर्मा, मनोज शर्मा, कांता कदम, उज्वला शेंडे, सरिता कोंडावार, प्रतीक्षा टिपरे, विजय वाटेकर, रोशन बंडेवार, आदींची उपस्थिती होती.