ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मासळ नियतक्षेत्रात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त

वनविभागाची पहाटे छापा कारवाई : मालकावर वनगुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      भद्रावती तालुक्यातील मासळ नियतक्षेत्रात अवैधरित्या वाळू (रेती) उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाने पहाटे छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आली असून संबंधित वाहन मालकाविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दि. १४ फेब्रुवारीला पहाटे सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने मासळ नियतक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक २१९ येथे धाड टाकली. ही कारवाई विभागीय वन अधिकारी राजन तलमले चंद्रपूर तसेच सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), विकास तरसे चंद्रपूर वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी के. डब्ल्यु. धानकुटे यांच्या नेतृत्वात पथकाने नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करणारा लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा सरपंच ट्रॅक्टर (क्रमांक एमएच – २९- बीपी – ०४१८) व क्रमांक नसलेली ट्रॉली ताब्यात घेतली. सदर वाहन भारत वसंतराव बोढेकर (रा. मांगली (रै.), ता. भद्रावती) यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले.

वाहन चालकाकडे रेती उत्खनन व वाहतूक परवान्याबाबत कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यानुसार ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून संबंधित मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत मासाळ क्षेत्र सहायक ए. बी. शेळकी, वनरक्षक कु. एस. आर. कुळमेथे,वनरक्षक एस. एस. पारवे,भद्रावती तसेच अनिल शेंद्रे, किशोर मडावी,पवन मांढरे आणि श्री. नितिन राऊत यांनी सहभाग घेतला.

अवैध वाळू उत्खननास आळा घालण्यासाठी वनविभागाकडून पुढील काळातही अशा धडक कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये