ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तिरवंजा जंगलातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड : आठ अटकेत

भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या कोंबडा बाजारावर तालुक्यातील तिरवंजा गावा लगत शेतशिवारात जंगलात धाड टाकून आठ जुगारींना अटक करण्यात आली तसेच धरपकडीत काही जण पळून गेले असल्याची माहीती सूत्रानुसार प्राप्त झाली.

भद्रावती पोलीसांची ही सर्वात मोठी कारवाई असुन महादेव गोपाळा गौरकार (वय३६) रा.खैरगाव ता.चंद्रपूर , विजय बाबुराव काटकर (वय ६६ वर्ष) रा. तुकुम एस.टि. वर्क शॉप जवळ चंद्रपुर, विनोंद मारोती मुनघाटे (वय ३८ वर्ष) रा.सिनाळा ता. चंद्रपुर जि. चंद्रपुर, अनिल किसन सोनटक्के (वय ४० वर्ष) रा.घुटकाळा तलाव ता. चंद्रपुर जि. चंद्रपुर, हर्षल सुधाकर बैरम (वय ३४ वर्ष) रा. जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर जि. चंद्रपूर, सुरेन्द्र पांडूरंग निनावे (वय ४३ वर्ष) रा. भानापेठ वार्ड विजय टॉकीज चंद्रपूर ता. चंद्रपुर जि. चंद्रपुर, शेख राजू शेख मुमताज वय ३५ वर्ष) रा. घुटकाळा वार्ड ता. चंद्रपुर जि. चंद्रपुर, सौरभ मनोज वानखेडे (वय २९ वर्ष) रा. गोकुल गल्ली बाजार वार्ड चंद्रपुर या आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले तर अन्य पसार झाले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भद्रावती तालुक्यातील तिरवंजा गावालगतचा जंगलात कोंबड्या पायाला कात्या बांधून त्यांच्या झुंजीवर जुगार खेळत आहेत, अशा मीळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीसांनी तीरवंजा गावालगत जंगलात शिताफीने सापळा रचून सुरू असलेल्या कोंबडा बाजारातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या घटनास्थळावरील आठ आरोपींना पोलीसांना ताब्यात घेतले तर अन्य आरोपी चार आरोपी पसार झाले असल्याची पोलीस सूत्रांनी माहीती दिली

प्रसंगी आरोपींकडून नगदी रोख रक्कम, झुंजीकरीता आणलेले दोन जिवंत कोंबडे, एक जखमी कोंबडा, एक मृत कोंबडा, दोन कात्या, सात मोटर सायकल असा एकूण ४ लाख ५९ हजार ३३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील आरोपींविरुद्ध भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कलम अन्वये गुन्हा नोंद करून आठा आरोपींना अटक करण्यात आले असल्याची पण माहीती सूत्रानुसार प्राप्त झाली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांचा मार्गदर्शनात महेंद्र बेसरकर, अशोक मंजुळकर, अनुप आष्टणकर, जगदिश झाडे, विश्वनाथ चुदरी, गजानन नागरे, खुशाल कावळे, शैलेश दुर्गेमवार, रोहित चिटगीरे व अंकुश खंडाळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये