डॉ.थानेश्वर कायरकर यांची “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार-२०२५ साठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.थानेश्वर कायरकर हे करीत असलेल्या उल्लेखनीय, प्रभावी कार्यातून एक सक्षम राष्ट्राच्या प्रस्थापणेचा प्रवाह भक्कम होऊन सखोल मानवीय अंतर्मनाचा चेहरा प्रफुल्लीत सन्मुख होतो. डॉ.थानेश्वर कायरकर कार्यरत असलेल्या क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहेच शिवाय त्यांच्या हातुन होत असलेली राष्ट्रसेवा ही खरोखरच अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे.
कष्टाची जाणीव व सत्याची कास धरुन चालताना त्यांच्याकडे पाहिले की कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना नक्कीच प्रेरणा मिळाते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कसे असावे याचा उत्तम उदाहरण त्यांच्या कडे पाहीले की लक्षात येतं.त्यांनी आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जपल्याने महाराष्ट्रतील अनेक कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल तसेच कर्तृत्वाबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या कार्याची दखल घेत आनुश्री धनश्री फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य सागंली च्या वतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार-२०२५” जाहीर करण्यात आला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनी पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.