ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मशागत सुरु असतांना विज पडून बैलाचा मृत्यू तर दुसरा बैल जखमी

केसुर्ली शेतशिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        शेतात मशागत सुरु असतांना विज पडून एका बैलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असुन दुसरा बैल जखमी झाला. सदर घटना केसुर्ली शेतशिवारात दिनांक २७ रो मंगळवारला दुपारी घडली. बैलाच्या मृत्युमुळे या हंगामात शेती कशी करायची हा प्रश्न सदर शेतकऱ्यापुढे पडला असुन नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.

कोंढा येथील प्रवीण नामदेव आगलावे यांची केसुर्ली शेतशिवारात शेती आहे. घटनेच्या दिवशी शेतात मशागतीचे काम सुरु असतांना अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यात अंगावर विज पडून एका बैलाचा मृत्यू झाला तर दुसरा बैल जखमी झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. सदर बैलाची किंमत एक लाख रुपये सांगण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये