दोन तासाचे आत चोरीस गेलेली मोटरसायकल व अज्ञात चोरट्याचा सावंगी पोलीसांनी लावला शोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी नामे विनोद बाळुजी शेंडे, रा. मांडवगड, ता.जि. वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दि. 15.05.2026 रोजी सायंकाळी 08:00 वा.चे सुमारास इंझापुर ग्रामपंचायत जवळ त्यांनी त्यांची पॅशन प्लस मोटरसायक कमांक एमएच 32 एन 6631 किंमत 50,000 रू ची उभी करून नास्ता करण्याकरीता समोरील टपरीवर गेले असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अशा तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे.सांवगी मेघे ला अप.क. 422/2026 कलम 303(2) बी.एन.एस. प्रमाणे नोंद आहे.
सदर गुन्हयाचे तपासात असताना मुखबीरकडून माहिती मिळाली की एक ईसम सावंगी इंजिनियरींग कॉलेज जवळ संशईतरीत्या एक मोटरसायकल घेवून फिरत आहे. अशा माहितीवरून सदर ईसमाचा शोध घेवून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव प्रेम कन्नाके वय 26 रा. इंझापुर, ता.जि. वर्धा असे सांगीतले. आरोपीचे ताब्यातून गुन्हयातील चोरी गेलेली पॅशन प्लस मोटरसायक कमांक एमएच 32 एन 6631 किंमत 50,000 रू ची पंचासमक्ष जप्त करण्यात आली.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे वर्धा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर वर्धा यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.



