ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा येथे घेतले विठ्ठलाचे दर्शन

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सुख समृद्धी देण्याची केली मनोकामना

चांदा ब्लास्ट

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी विदर्भातील प्रति पंढरपूर समजल्या जाणा-या वढा तिर्थक्षेत्र येथे जात विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शेतक-यांना सुख समृद्धी देण्याची मनोकामना केली. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्तामहिला शहर संघटिका वंदना हातगावकरयुवती प्रमुख भाग्यश्री हांडेबंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, शहर संघटक विश्वजित शहा, ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, सतनाम सिंग मिर्धा, निलिमा वनकररुपा परसरामवंदना हजारेकविता निखारेप्रमिला बावणे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूरातील धार्मिक स्थळांना महत्व प्राप्त करुन देण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहे.  चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती राज्यात पोहचावी यासाठी आपण महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. याला लाभलेला लोकसहभाग ऐतिहासिक आहे. यासोबतच वढा तिर्थक्षेत्रही आपल्याला धार्मिक आणि पर्यटनदृष्टा विकसीत करायचे आहे. यासाठी शासनस्तरावर माझे प्रयत्न सुरु आहे. यात गावक-र्यांचाही सहभाग लागणार आहे. हे ठिकाण विकसीत झाल्यास वढा गावाचे धार्मिक महत्व वाढणार असुन रोजगारांच्या संधीही  ग्रामस्थांना मिळणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी त्यांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन नागरिकांच्या सुदृढ आरोग्याची प्रार्थना केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये