ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोकरा योजनेत चंद्रपूरचा समावेश मंत्री मंडळाचा निर्णय!

विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात होते मात्र चंद्रपूर जिल्ह्यात सुध्दा शेतकरी आत्महत्याचा आकडा सतत फुगत असताना विदर्भातील काही जिल्हे या योजनेत वगळण्यात आले होते जनसत्याग्रह संघटनेचे सय्यद आबिद अली यांनी हिवाळी अधिवेशन काळात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार कृषी मंत्री अब्दुल सतार याना पोकरा योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करून शेतकऱ्यावरील अन्याय दूर करा अशी मागणी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे सतत पाठपुरावा करीत विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून अखेर पोकराच्या दुसऱ्या टप्यात नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळ बैठकीत दि. २८ ला चंद्रपूर सह नागपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया या जिल्ह्याचा समावेश करून शेतकऱ्याला न्याय दिला दुसऱ्या टप्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने ६ हजार कोटी रु.खर्चातून दुसऱ्या टप्यातील जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे सिंचन उत्पादन व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून विदर्भ मराठवाड्याच्या शेतीच्या विकासाला गती येईल मंत्री मंडळाने या भागास व आदिवासी भागास संधी दिल्या बद्दल मंत्रीमंडळ मान्यवर मंत्र्याचे आभार व्यक्त करीत शेतकऱ्यानमध्ये निर्णयाचा उत्साह संचारला आहे या निर्णयामुळे शेती सलग्न जोडव्यवसाय सिंचन आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध होऊन कर्ज बाजारी शेतकऱ्याना आत्महत्या सारखे निर्णयावर या उपक्रमातून प्रतिबंध व शेती विकासाला चालना मिळेल अशा विश्वास व्यक्त केल्या जात आहे तसेच मानव विकास मिशन योजनेत कोरपना ह्या आदिवासी मागास भागाचा समावेश व्हावा अशी मागणी सतत होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये