ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

रोटरी क्लब आँफ चंद्रपूरच्या अध्यक्ष पदी अनूपकुमार यादव तर सचिव कुंजबिहारी परमार

तसेच, सहसचिव मिलींद बोडखे तर रोखपाल पदी रवींद्र जैन यांची निवड

चांदा ब्लास्ट

सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेल्या रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्ष पदी अनुपकुमार यादव तर सचिव पदी कुंजबिहारी परमार यांची निवड करण्यात आली आहे.

मागील ४८ वर्षापासून चंद्रपूर शहरात अग्रेसर रोटरी क्लब आँफ चंद्रपूरचे सामाजिक क्षेत्रात योगदान आहे. चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. लोकांकरिता आँक्सिजन जनरेशन प्लांट पासून तर डायलेसिस सेंटर सुरू करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अनेक लहान मोठ्या सामाजीक कार्यात रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे योगदान आहे. यावर्षी देखील विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून रोटरी क्लब समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी तयार आहे. रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे २०२३ – २४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. यामध्ये रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष पदी अनुपकुमार यादव तर सचिव पदी कुंजबिहारी परमार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

सहसचिव मिलींद बोडखे तर रोखपाल पदी रवींद्र जैन यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार ८ जुलै रोजी नवीन कार्यकारिणीचा पद्ग्रहण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रकल्प निर्देशक म्हणून अजय पालारपवार व अनुपा भांमरी यांनी भूमिका सांभाळली आहे तर रोटरीचे ज्येष्ठ सदस्य सचिन गांगरेडीवार, राम चांदे, विजय आईंचवार, रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष अजय जयस्वाल, मनीष बोराडे, मधूसुधन रुंगठा यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये