क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध देशी – विदेशी दारूचा साठा पोलीसांच्या ताब्यात

आरोपी फरार - २ लाख ४२ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 29/06/2023 रोजी मुखबिरकडून खात्रीशिर खबर मिळाली की, बोरगाव मेघे वर्धा येथे राहणार अक्षय गलुले हा त्याचे हुडाई कंपनीची सेन्ट्रो कार क. MH 31 CM 4743 मध्ये अवैध रित्या देशी विदेशी दारू भरून पुलगाव कडुन वर्धा येथे घेवुन येत आहे. असे माहिती वरून शिल साहित्य व इतर अत्यवश्यक कागदपत्रासह खाजगी वाहनाने खबरेप्रमाणे मौजा नागठाण चौक वर्धा जावुन नाकेबंदी करिता असतांना पुलगाव कडुन एक सिल्हर रंगाची कार आली असता त्यास पो.स्टॉफच्या मदतीने थाबण्याचा ईशार केला असता सदर आरोपीने आपले ताब्यातील वाहन न थांबविता परत वळविले व पळुन जाण्याचा प्रयत्न करित असतांना त्याचा खाजगी वाहनाने पंच व पो.स्टॉफसह पाठलाग केला असता आरोपीने वाहन हे रोडलगत उभे करून कार सोडुन पळुन गेला त्याचा आम्ही व पो.अंमलदार त्याचा पाठलाग केला असता मिळुन आला नाही. सदर आरोपी यांने मौक्यावर सोडुन दिलेली हुडाई कंपनीची सेन्ट्रो कार क. MH 31 CM 4743 हिची पंचासमक्ष आम्ही झडती घेतली असता सदर कार मध्ये 1) दोन खरडयामध्ये 180 एम.एलच्या officer choice कंपनीच्या प्रति खोक्यामध्ये 48 निपा प्रमाणे एकुण 90 निप्पा प्रति निप 200 / रू प्रमाणे किंमत 19,200 / रू. 2) एका खरडयाच्या खोक्यामध्ये मध्ये 180 एम.एलच्या officer choice blue कंपनीच्या 48 निप्पा प्रति निप 250 / रू प्रमाणे किंमत 12,000/ रू. 3) एका खरडयाच्या खोक्यामध्ये मध्ये 180 एम.एलच्या officer choice blue कंपनीच्या 24 निप्पा प्रति निप 250 / रू प्रमाणे किंमत 6000/रू. 4) एक खरडयामध्ये देशी दारूने भरलेल्या टॅगो पंच कंपनीच्या 90 एम.एलच्या 96 निपा प्रति निप 50/ रू प्रमाणे किंमत 48,00/ रू. असा देशी विदेशी दारूचा माल बिनापास परवाना असलेला 5) एक जुनी वापरती सिल्व्हर रंगाची सेंट्रो कंपनीची कार क्रमांक MH 31 CM 4743 किंमत 2,00000/ रू. असा जु.कि. 2,42,000 / रू चा माल अवैधरीत्या विना पासपरवाना मिळून आला. सदर प्रकरणी आरोपी अक्षय गलुले रा. बोरगाव येथे ता. जि. वर्धा याचेविरुध्द पो.स्टे. रामनगर येथे अप.क्र. 586/2023 कलम 65 (अ) (ई). 77 अ, मुं.दा.का. अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब वर्धा, अप्पर पोलीस अधिक्षक साहेब वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब वर्धा, पोलीस निरिक्षक महेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोहवा ज्ञानेवश्वर निमजे, पोलीस नाईक सचिन दवाने पोलीस शिपाई प्रकाश खाडे, अजित सोर, मुकेश वादिले, उदय दाते, मंगेश ठाकुर विशाल देवकते पो.स्टे. रामनगर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये