ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे केवळ प्रवासाचे नव्हे तर विकासाचेही साधन – खा. धानोरकर

खा. धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण आज देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाले.

आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे स्टेशन चंद्रपूरच्या प्रगतीचा नवा अध्याय आहे. नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी उभारलेले हे अत्याधुनिक स्थानक चंद्रपूरकरांच्या स्वप्नांची पूर्ती करेल, यात शंका नाही. रेल्वे केवळ प्रवासाचे माध्यम नसून, हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा दुवा आहे, आणि हा दुवा आम्ही अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे मत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रिय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, बिलासपूरचे सीई बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, नागपूरचे सिनिअर डीएम एस. एन नामदेव, स्वातंत्र्य सेनानी डॉ. शेषराव इंगोले, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, कॉग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, इंटक युवक काँग्रेस जिलाध्यक्ष प्रशांत भारती, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार यांची उपस्थिती होती.

चांदाफोर्ट स्टेशनच्या पुनर्विकासातील पहिल्या टप्पयात एकूण अंदाजित खर्च १९.३ कोटी रुपयाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये नवीन स्टेशन इमारत: ३९६ चौ.मी. (एकूण क्षेत्र – ७९२ चौ.मी.), फिरणारे क्षेत्र ६०५० चौ.मी. (एकूण – ६९९५ चौ.मी.), प्लॅटफॉर्म निवारा ९६० चौ.मी. (एकूण – १८७९ चौ.मी.), प्लॅटफॉर्म पृष्ठभाग २००० चौ.मी. (एकूण – २५०० चौ.मी.), फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) १२ मीटर रुंदीचा नवीन ब्रिज, सुगम प्रवेशासाठी नवीन बांधलेले रॅम्प आणि स्पर्शिक मार्ग (टॅक्टाइल पाथ) या अद्ययावत सुविधांमुळे चंद्रपूरकरांना अधिक सुरक्षित, सुलभ व आरामदायक रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळेल. तसेच, जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला यातून बळ मिळेल, असा विश्वास खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये