महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्व शिबिराच्या आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये विद्यार्थी विकास विभागाद्वारे व्यक्तिमत्व शिबिराचे आयोजन आज पासून दिनांक 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन मा.श्री विठ्ठलरावजी थिपे उपाध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिता वाळके प्राचार्या,कर्मवीर महाविद्यालय मुल यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले. त्याचबरोबर एड. दीपांजली मंथनवार मॅडम कायदेविषयक सल्लागार कोरपना न्यायालय, प्रा. चेतना येरणे मॅडम महात्मा गांधी विद्यालय, प्रा. शरद बेलोरकर शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर यांनीही मार्गदर्शन केले.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या विषयाचे तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व कार्य कुशलता आरोग्य पर्यावरण शिक्षण रोजगार सामाजिक समस्या इत्यादी विषयांना हात घातल्या जाणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव सर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. मनोहर वांद्रे, ग्रंथपाल यांनी केले. यावेळी डॉ. अनिस खान प्रा. पवन चटारे, डॉ. रामकृष्ण पटले, प्रा. चेतन वानखेडे, डॉ. संदीप घोडिले, डॉ. उत्कर्ष मुन, प्रा. चेतन वैद्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अजय कुमार शर्मा समन्वयक विद्यार्थी विकास विभाग यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविकता उत्कृष्टरित्या केली. याप्रसंगी महाविद्यालयातील एन एस एस व कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला



