अन्यायकारक संचमान्यता त्वरीत रद्द करा
प्रजासत्ताक शिक्षक संघाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र शासनव्दारा जारी करण्यात आलेल्या दि. १५ मार्च २०२४ चा संचमान्यता बाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करावा
आणि शिक्षकांना न्याय द्यावा ह्या संबंधीचे निवेदन पत्र प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्या वतीने चंद्रपूर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आले.
संपूर्ण राज्यात इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळामुळे शासनमान्य अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होत असून समायोजनाची समस्या निर्माण झाली आहे. ही समायोजन समस्या सुलभ व्हावी. त्या संबंधीत दि.१५ मार्च २४ चे पत्र रद्द करावे अशी मागणी प्रजासत्ताक शिक्षक संघटनेने केली आहे.
यात वर्ग ५ ला २० विद्यार्थीवर एक शिक्षक, वर्ग ६ ते ८ करीता ६० विद्यार्थीवर तीन शिक्षक तर वर्ग ९ व १० साठी ४० विद्यार्थीवर २ शिक्षक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहे. ही बाब गंभीर आहे. सोबतच जिल्ह्यातील अनेक शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदे पण कमी होत आहे. यामुळे मुलांचे नुकसान होत आहे. त्यांच्या सर्वांगिण विकास करण्यास पुरेसा शिक्षक वर्ग असणे अत्यंत आवश्यक आहे.
सदर मागणीचे पत्र प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अँड. रवींद्र मोटघरे, सचिव राऊत, प्रा. मनोहर बांबोळे सर, एस.पी. साठे सर, पी. बी. सोरते सर, व्ही.एस. रामटेके सर आणि इतर कार्यकारणी सदस्यांनी दिले आहे. सदर निवेदन शासन स्तरावर पाठवू. अशी हमी शिक्षणाधिकारी माध्यमिक पातळे यांनी दिली.