दुचाकी अडवून पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्याचा पोबारा…
तीन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
लग्न समारंभ आटोपून गावी जात असताना देऊळगाव राजा शहराबाहेरील कुंभारी बायपास येथे तीन अज्ञात इसमांनी दुचाकी स्वार ला अडवून मारहाण करून रोख रकमेसह दुचाकी घेऊन पलायन केल्याची घटना दिनांक 13 मे रोजी रात्रीला घडली, याप्रकरणी दिनांक 14 ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की. फिर्यादी अण्णा रामराव ढाकणे व 42 वर्ष राहणार चांदई एक्को तालुका भोकरदन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा भाऊ शंकर रामराव ढाकणे हे दिनांक 13 रोजी देऊळगाव राजा येथे चिखली रोडवरील योगीराज लॉन्स येथे लग्न समारंभासाठी आले होते लग्न समारंभ आटोपल्यानंतर ते त्यांच्या गावी जात असताना तीन अज्ञात इसमाने त्यांची दुचाकी शहराबाहेरील कुंभारी बायपास वर त्यांचे दुचाकी अडवली तीन अज्ञात इसमानी त्यांच्या डोक्यावर तोंडावर डोळ्याजवळ लोखंडी रॉड ने मारहाण केली त्यासोबतच त्यांची दुचाकी ची सुद्धा तोडफोड केली तीन अज्ञात इसमाने त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये, जुना मोबाईल किंमत दहा हजार रुपये, तसेच मोटर सायकल किंमत तीस हजार रुपये असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला संदर्भात फिर्यादी यांनी दिलेल्या तीनही अज्ञात आरोपी विरुद्ध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत.