कला वाणिज्य महिला महाविद्यालय, बल्हारपूरच्या विद्यार्थीनीची तायकान्दो व कुस्ती संघात निवड

चांदा ब्लास्ट
स्थानिय कला वाणिज्य महिला महाविद्यालय बल्लारपूर येथील विद्यार्थिनी कु. नुपूर संजय दुबे, बी. ए. प्रथम वर्षात शिकत असून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली 2023-24 या सत्रातील तायकोन्दो संघामधून निवड होऊन अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राजस्थान येथील जगदीश प्रसाद झावरलाल डिपडेवाला विद्यापीठ चुडेला राजस्थान येथे तायकान्दो स्पर्धेत भाग घेतला तसेच कु. अंजली उमानाथ निषाद बी. ए. प्रथम वर्ष 2023-24 सत्रातील विद्यार्थीनीनी अखिल भारतीय चंदिगड विद्यापीठ मोहाली (पंजाब) येथे कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता.
दोन्ही विद्यार्थीनींना वरील स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केले त्या विद्यार्थीनीचे सत्कार गौरव सर्वसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरचे संस्थाध्यक्ष मा. श्रीकांतजी चहारे, आणि संस्था सचिव मा. प्रा. अनिलजी शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रविन्द्र केवट शारिरीक शिक्षक विभाग प्रमुख डॉ. वैशाली चोरे तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी त्या खेळाडूचे अभिनंदन केले.