समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयात, देऊळगाव राजा २०२५ च्या बारावीच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. प्रथम क्रमांक पूनम सुरेश शिवरकर 85.33 टक्के, द्वितीय क्रमांक हर्षदा गजानन कायंदे 85 टक्के, तृतीय क्रमांक युवराज कैलास गीते 84.50 टक्के मिळवत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला.
गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षा नंदाताई कायंदे व सचिव सतीश कायंदे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. विद्यालयाचे प्राचार्य सचिन घुगे यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे विशेष कौतुक करून सांगितले की, “या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा हे सर्व घटक कारणीभूत आहेत. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत.”