ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड येथील गटार योजनेची कामे कासव गतीने सुरू

पावसाळ्यात जनतेचे हाल.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड नगर परिषद क्षेत्रात अनेक कामे सुरू असून अनेक कामे अनियमितआहेत. मात्र नियोजनाअभावी कामे होत नसून होणारी कामे ही नावापुरती असल्याचे दिसून येत आहे. नागभीड नगर परिषद क्षेत्र हे चंद्रपूर महानगर पालिकेच्या क्षेत्रा एवढे असल्याने विकासाची कामे कासव गतीने सुरू असून गटार योजना ही गटारात टाकावी लागेल अशी वस्तुस्थिती आहे. नगरात नाली, पाणी आणि गटार योजनेची कामे असल्याने परिसरात रस्त्याचे तीन तेरा वाजले असून याकडे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये