ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशच्या तालुका अध्यक्षपदी अमोल दौलतकर तर महिला तालुका अध्यक्षपदी सौ. करुणा मोघे यांची नियुक्ती

शहराध्यक्ष पदी उमेश काकडे तर शहर सचिव पदी योगेश ताजने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 3 रोज शनिवारला पार पडलेल्या पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशच्या तालुका अध्यक्षपदी अमोल दौलतकर तर महिला तालुका अध्यक्षपदी सौ. करुणा मोघे यांची तर शहराध्यक्ष पदी उमेश काकडे तसेच शहर सचिव पदी योगेश ताजने

यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष दलित मित्र तथा आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांच्या या निवडीमुळे भद्रावती तालुका व शहरातील पर्यावरण चळवळीला गती प्राप्त होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

              सदर सभेला पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्ष डी. के. आरिकर तथा विदर्भ व जिल्हास्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय तालुका संघटक पदी प्रकाश पिंपळकर, तालुका सचिव पदी स्वप्नील मोहितकर, शहर संघटक पदी संदीप गोखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी प्रमिला ताई लेडांगे राज्य उपाध्यक्ष, विद्याताई चिताडे महिला जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, नूतन लेडांगे संपर्कप्रमुख चंद्रपूर यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अतुल कोल्हे, मनोज मंदे वरोरा विधानसभा संघटक, सौ. लीला ताई ढुमणे, सौ. मोनालीका कोल्हे, वनिता घुमे, गजानन घुमे तथा सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या असुन नवनियुक्त पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये