ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीज ग्राहकाला लाच मागाल तर सस्पेंड व्हाल.! – राष्ट्रवादी किसानसभेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज कोणत्याही कार्यालयात जा कामासाठी पैसे मोजले तरच अधिकारी ग्राहकांचे काम करतो. याला कारण आपले निवडुन दिलेले लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. अधिकारी म्हणतात आम्हाला नेत्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे पोहचवावे लागतात हे त्या ग्राहकाला सांगतो.

आज सर्वात भ्रष्ट झाले ते महावितरण कार्यालय, या कार्यालयाची पायरी ओलांडायची असेल तर आपला खिसा गरम पाहिजे. असेच कारला चौकातील उपकार्यकारी (महावितरण) अभियंत्याचे कार्यालय आहे. बहादुरे नावाचे गृहस्थ त्या कार्यालयाचे प्रमुख आहे. गुलाब बापुराव घोडे यांचे कारला ग्रा. प. वार्ड नं. 5 येथे “व्दारका दुध डेअरी” नांवाचे दुकान आहे. त्यांच्या घरावरुन 11 के.व्ही. व एल.टी. विद्युत वाहिणी गेली आहे. घराला लागुन गेलेल्या वाहिणीला काढुन केबल जमिनित टाकुन हा प्रश्न निकाली लागु शकतो. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा लाई टाकली तेव्हाच महावितरणने आपली जबाबदारी काय? याचा विचार करायला पाहिजे होता. मात्र आज ग्राहकाला लाख रुपयाचा भुर्दंड सहन करुन ते काम करावे लागेल. त्यासाठी या बहादुरे महाभागाने 10000/- रुपयाची लाच मागितली. एवढेच नाहीतर माझ्यासमोर एक शेतकरी आला. आज शेतीच्या पेरणीची वेळ आली. पाऊस सुरु झाल्यामुळे शेतात पोल टाकता येणार नाही असे त्या ग्राहकाचे म्हणने. मात्र जो साहेबांचा ठेकेदार आहे त्याने त्या गरिब शेतकऱ्याला 50,000/- (पन्नास हजार) रुपयाची मागणी केली. पैसे द्या एका दिवसात आपले काम करुन देतो असे साहेबांच्या लाचखोर ठेकेदारांचं म्हणणे त्या ग्राहकाने माझ्यासमोर स्पष्ट केले.

आता या लाचखोरांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसू नका असे आवाहन राष्ट्रवादी किसानसभेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे यांनी केले जर पैसे घेतले तर आपण सस्पेंड व्हाल असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये