ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड येथील बस स्थानक प्रवासाच्या सेवेसाठी उपलब्ध केव्हा होणार?

प्रवाशांचे हाल कोण सोडविणार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील बस स्थानकाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असून ते केव्हा पूर्णत्वास जाईल हे आज तरी सांगणे कठीण असले तरी प्रवाशाचे जे हाल होत आहेत त्यासाठी प्रशासन की आगार व्यवस्थापन यापैकी कोण समस्या सोडविणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

परंतु गेल्या पाच वर्षांपासून बस स्थानकाचे काम सुरु असून त्यातील अनेक बांधकाम अर्धवट असल्याने प्रवाश्यांना रस्त्यावर उभे राहून आणि ऊन वारा, पाऊस आल्यास टपऱ्यांचा आसरा घ्यावा लागतो यामुळे प्रवासाच्या सेवेचे तीन तेरा वाजले असून याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूक घेत असल्याने एस टी महामंडळाचे नुकसान होत आहे याकडे आगार व्यवस्थापकाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये