ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश 

४२ विद्यार्थी पात्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेली उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 8 वा फेब्रुवारी- 2024 चा अंतिम निकाल घोषित करण्यात आला. त्यात वर्ग पाचवी चे 17 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले तर वर्ग आठवीचे 25 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र त्याबद्दल वर्ग पाचवी आणि आठवीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक शंकर तुरांनकर, विणा देशमुख,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

तसेच संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे,सचिव धनंजय गोरे तथा, संचालक मंडळांने शिष्यवृत्तीधारक सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये