ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदर्श कृतत्व आणि नेतृत्वाचे धनी मा.चंद्रकांत दामेकर गुरुजी – श्रीपतभाऊ राठोड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नुकताच नांदेड जिल्हास्तरावर अविरत ३७ वर्ष शिक्षण क्षेत्रात शिक्षक,केंद्रप्रमख आणि शिक्षक संघटनेत राज्यस्तरीय नेतृत्व करुन अनेक पुरस्कार प्राप्त करणारे कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर राहणारे मा.चंद्रकांत दामेकर गुरुजींचा नुकताच नांदेड येथील सरपंच नगरातील स्वंयवर मंगल कार्यालयात भव्य सेवापूर्ती सोहळा पार पडला.

सपत्नीक कुटूंबासह भव्य सत्कार करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते विशाल स्मृतिचिन्ह,शाल व अनेक उपहार देवून सन्मान करण्यात आला.जिल्हयातील अनेक क्षेत्रातील मान्यवर, बहुसंख्य शिक्षक,शिक्षिका,सामाजिक,राजकिय क्षेत्रातील मान्यवर सदर कार्यक्रमात सहभागी होवून मा. चंद्रकांत दामेकर गुरुजींच्या अद्वितीय मौलिक, निरंतर दिशादर्शी प्रेरणादायी कार्याचे भरभरून कौतुक केले.कर्तत्त्व,नेतृत्व आणि कुशल संगठन बांधनीचे कौशल्यप्राप्त मा. चंद्रकांत दामेकर गुरुजींनी आपले वडील संत गाडगेबाबांच्या विचारांनी भारावलेले कै.केशव सावकार दामेकरांच्या सेवाभावी कार्याचा वसा जपत शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तवादी विचारांचा अंगिकार करून अनेकविध समस्या सोडविले असल्याने अनेकांनी त्यांच्या कार्याचे गौरव केले. शिक्षक नेते चंद्रकांत दामेकर आदर्श कृतत्व आणि नेतृत्वाचे धनी असल्याचे श्रीपतभाऊ राठोड यांनी आपल्या मनोगतात आवर्जून प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदास बस्वदे, उद्घाटक खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर,. माजीमंत्री डी.पी. सावंत, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, दिनकर हनमंते, फारूख बेग, प्रकाश मुंगल, श्रीपतभाऊ राठोड, जीवन पाटील वडजे, अशोक पवळे, दिलीप देवकांबळे, विठ्ठल बनबरे चेअरमन अशोक पाटील मारतळेकर, प्रभू सावंत, राजश्री देशमुख यांची उपस्थित होती. संघटनेच्या वतीने चंद्रकांत दामेकर यांचा सपत्नीक चंद्रकांत मेकाले यांनी शब्दबद्ध केलेले मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष कदम तसेच सूत्रसंचालन गंगाधर सावळे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये