ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रेक फेल झालेला ट्रक रस्ता दुभाजकावर चढला

ट्रक चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

         चंद्रपूर वरून माजरी एकता नगर कडे जाणाऱ्या एका ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. मात्र ट्रक चालकाने प्रसंगावधान राखीत सदर ट्रकला रस्ता व्दिभाजकावर चढवून थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. सदर घटना शहरातील बसस्थानका समोरील हायवेवर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.या घटनेत रस्त्या व्दिभाजकावरील लावलेल्या रेलिंग चे थोडेफार नुकसान झाले.

मात्र कुणालाही इजा झाली नाही. एम एच 34 bg 2742 या क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर वरून माजरी एकता नगर कडे जात होता. शहरातील बसस्थानकासमोर आल्यानंतर या ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. यावेळी हायवे च्या बाजूला काही ट्रॅव्हल्स व इतर गाड्या उभ्या होत्या. व सायंकाळची वेळ असल्यामुळे नागरिकांची चांगलीच वर्दळ होती.

मात्र ट्रक चालकाने न डगमगता प्रसंगावधान राखून व आपले कौशल्य पणाला लावून ट्रकला रस्ता द्विभाजकावर चढवून थांबविले. ट्रक चालकाच्या या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये