खेडमक्ता गावात बिबट्याचा संचार..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी वनविभागा अंतर्गत येणाऱ्या खेड मग त्यातील बुद्ध विहार परिसरात २० नोव्हेंबरच्या रात्री११:४३ वाजताच्या दरम्यान बिबट्या मुक्तपणे संचार करतांना दिसून आल्याची घटना येथील बुद्ध विहारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहे.
त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. संबंधित सीसीटीव्हीच्या चित्रफिती नुसार बिबट्याच्या संचारा संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून वन विभाग सुद्धा ॲक्शन मोडवर आला आहे. दरम्यान खेडमक्ता येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर लाडे यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सोबतच रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळावे पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि कोणत्याही संशय याबाबत हालचाली दिसल्यास त्वरित वन विभागाला याची माहिती द्यावी असे कळवले आहे. दोन तिन दिवसा आधी खेड चांदली रोड वर सुद्धा रात्री मुक्त संचार करतानाचा व्हिडिओ आला होता समोर



