ताज्या घडामोडी

आंतरविद्यापीठ स्पर्धेत राधिका दोरखंडे ठरली अजिंक्य – तीन विद्यापीठांनी घेतला सहभाग

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

विदर्भ युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर्स असोसिएशन द्वारे गडचिरोली, नागपूर व अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली येथे चर्चासत्र आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेत तीनही विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या तब्बल 75 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

शिवाजी महाविद्यालय राजुरा येथिल पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी राधिका दोरखंडे हिने सर्व स्पर्धकांवर मात करून प्रथम क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे ह्या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीला तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला. राधिकाच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी वरकड, उपप्राचार्य राजेश खेरानी, प्रा. डॉ. विशाल दूधे, माजी विद्यार्थी संघाचे सचिव बादल बेले ह्यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये