ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
8 एप्रिल रोजी देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार तालुका व जिल्हा कार्यकारिणी गठित करण्याच्या दृष्टीने देऊळगाव राजा येथे काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक 8 एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे
या सभेला प्रदेश काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले जिल्हा निरिक्षक मा राजेंद्र राख, जिल्हा काँगेस कमेटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे उपस्थित राहणार आहे
तरी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.