स्वराज नगर येथे मंदिरात श्री हनुमान, गणेशाची तथा शिवपिंडाची प्रतिष्ठापना
भजन, दिंड्यासह भव्य मिरवणूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
हनुमान जन्मोत्सव समिती, स्वराज नगर यांच्यातर्फे नव्यानेच बांधण्यात आलेल्या स्वराज नगर येथील हनुमान मंदिरात दिनांक 3 रोज शुक्रवारला हनुमान मूर्ती तथा शिव पिंडीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रथम सकाळी 8 वाजता गवराळा प्रभागातून हनुमान मूर्ती तथा शिवपिंडीची भजन, दिंड्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत कलशधारी महिलांसह प्रभागातील नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर मंदिरात भाके महाराज यांच्या मार्गदर्शनात विधिवत पूजा व होम हवन करून हनुमान मूर्ती, गणेश मुर्ती तथा शिव पिंडीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरात भजन पुजनासह अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान मूर्तीचे दान दीपक कुमरे यांनी तर शिवपिंडीचे दान रवींद्र गोटेफोडे व गणेश मुर्ती राहुल ढगे, त्रिशूळ रमेश अनमूलवार कळस दाते शंकर काकडे यांनी मंडळास सहकार्य केले.
या प्रतिष्ठापना कार्यक्रमाला लेआऊट धारक युवराज धानोरकर, प्रतिष्ठित व्यापारी व दानशूर निलेश गुंडावार यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी हनुमान जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, युवा सदस्य तथा प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी समिती तर्फे सर्व दात्यांचे व देणगीदारांचे आभार व्यक्त करण्यात आले.