ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

६५ वर्षीय वृद्धेची घरातच गळफास घेऊन आत्महत्या

भद्रावती येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        एका ६५ वर्षीय वृद्धेने आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना शहरातील बंगाली कॅम्प,  नेताजी नगर येथे दिनांक दोन रोज बुधवार ला दुपारी एक वाजता च्या सुमारास घडली. किरण मनोरंजन मंडल, वय ६५ वर्षे असे या मृतक वृध्देचे नाव आहे.

मृतक महिला व तिचा पती बंगाली कॅम्प येथे राहतात. घटनेच्या दिवशी पती बँकेत गेले होते. बँकेतून परत आल्यानंतर मृतक महिलेने आत्महत्या केल्याचे  उघडकीस आले. मृतक  महिला ही आजाराने त्रस्त होती या आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे  समजते. सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना  प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये